मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातअतिवृष्टीने कहर केल्याने शेती पिके उध्वस्त झाली असून शेतकरी रडकुंडीस आला आहे.परिणामी शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केली आहे.
अस्मानी व सुलतानी संकटात कसातरी तक धरून असलेला शेतकरी हिला तीन दिवसातील अतिवृष्टीमुळे हवालदील झाला आहे.अतिवृष्टीचा नांदुरा आणि मलकापूर या तालुक्यांना मोठा फटका बसलेला असून या तालुक्यातील सोयाबीन,मका, कापूस, तूर, उडीद,मूंग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यावर्षी सोयाबीन, मुंग, उडीदाचे पीक चांगल्या स्थितीत होते.परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे सरकारने विना पंचनामे करून तात्काळ नुसकान भरपाई देण्याचे आदेश काढावे अशी मागणी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी केली आहे.