देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) पंचायत समितीमध्ये महिलेने तक्रार का केली म्हणून महिलेला आरोपी पती-पत्नीसह दिराने अश्लील शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु येथे घडली.
पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी पुष्पा मधुकर भालेराव रा. निमगाव गुरु यांना आरोपी परमेश्वर आत्माराम भालेराव,भीमराव आत्माराम भालेराव,संगीता भीमराव भालेराव तिघेही रा. निमगाव गुरु ता. देऊळगाव राजा यांनी 5 सप्टेंबर रोजी फिर्यादीला ‘तू आमची पंचायत समिती कार्यालयात तक्रार का केली या कारणावरून वाद घातला.फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीच्या पतीला ओढून घराबाहेर काढले.व फिर्यादीला अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे.या तक्रारीवरून पोलिसांनी तीनही आरोपी विरुद्ध 332(सी),296, 115,352,351(2),351(3),3(5)बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ कलीम देशमुख करीत आहेत.










