देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन केंद्रीय राज्य मंत्री ना. प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या अथक प्रयत्नांतून देऊळगाव राजा शहरात 175 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून प्रगतीपथावर असलेल्या विविध विकास कामांची पाहणी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी 4 सप्टेंबर रोजी केली.
आदर्श कॉलनी येथील प्रगती पथावर असलेल्या डी पी रोडच्या कामाची पाहणी, बाजार परीसरात पाणीपुरवठा योजना अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी, शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या 16 हायमास्ट लाईट चे लोकार्पण, तहसिल कार्यालय परीसरात प्रगतीपथावर असलेल्या महसूल भवन बांधकामाची पाहणी, संजयनगर येथे प्रगतीपथावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र ची पाहणी, बस स्थानक चौकातील प्रगती पथावर असलेल्या डी पी रोडच्या कामाची पाहणी, पिंपळनेर येथे प्रगती पथावर असलेल्या पाणी टाकीच्या बांधकामाची पाहणी, आमना नदी सौंदर्यीकरण अंतर्गत महादेव मंदीर विकास कामांची पाहणी, तसेच काळूंका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडचे लोकार्पण करण्यात आले तसेच महसोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी, केली व माळीपुरा येथे पाणीपुरवठा योजना अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या अंतर्गत पाइप लाइनच्या कामाची पाहणी केली.देऊळगाव राजा शहरातील नागरिकांना येत्या काही दिवसांत एकदिवसाआड पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असा विश्वास माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत शहरात 167 सोलर स्ट्रीट लाईट चे पोल मंजूर झाले आहे, त्यापैकी 140 सोलर स्ट्रीट लाईट पोल उभारणीचे काम पुर्ण झाले असून उर्वरित 27 पोलचे काम विजय कलेक्शन ते संतोष चित्रमंदिर पावेतो च्या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर पोल उभाण्यात येइल असे त्यांनी सांगितले, पत्रपरिषदला शिवसेनेचे नेते दिपक बोरकर,गोपाल व्यास,डॉ रामदास शिंदे, जगदीश कापसे यांच्यासह आदि उपस्थित होते.