बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्य परिवहन म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृति समितीने व विविध संघटनांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. शासनातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यास ६,५०० रुपयांची मूळ वेतनात वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला असून ‘लालपरी’ आज पहाटेच रस्त्यावर उतरली आहे.
दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीसाठी राज्यभरात लोक प्रवास करत आहेत. या प्रवासामध्ये संपामुळे मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपही मागे घेण्यात आला.
गेल्या दोन दिवसात एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे.आज मात्र लालपरी रस्त्यावर उतरली असून प्रवाशांची गैरसोय थांबलेली आहे.
▪️एसटी कर्मचाऱ्यांचा ‘या’ मागण्या मान्य…
१) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना १
एप्रिल, २०२० पासून सरसकट मुळ वेतनात ६५०० रुपये वाढ.
२) जुलै २०१६ ते जानेवारी २०२० या काळातील प्रलंबित
महागाई भत्ता देण्यात येणार
३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक
वेतनवाढ लागू
४) वेतनवाढीच्या २१०० कोटी रुपयांची शिल्लक रक्कम
कामगारांना वाटप मिळणार.
५) वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना कामगारांना लागू होणार
६) कर्मचारी आणि कुटुंबीयांना एसटीत फरक न करता १
वर्षाची मोफत पास सवलत मिळणार
७) आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होणार नाही