सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काल रविकांत तुपकर यांना आंदोलन मागे घेण्यासाठी एसडीओ, तहसीलदार यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.दरम्यान ‘आधी पिक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा. गुन्हा का दाखल करीत नाही?, मी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नसून,टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना तूपकरांनी खडेबोल सुनावले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन टप्प्याटप्प्याने उग्र स्वरूप धारण करणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेने धास्ती घेतली आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलन कधीच फेल जात नाही.खरे आंदोलक म्हणून तूपकर महाराष्ट्रात पश्चिम विदर्भात प्रसिद्ध आहे.तूपकर यांच्या आंदोलनाने प्रशासकीय यंत्रणा हा धरून जात असते.यावेळी ही यंत्रणा हादरली असून,त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मागे घेण्याची विनंती केली जात आहे.त्यामुळे काल उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पिकविमा कंपनीचेअधिकारी,कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले व त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करणार नाही अशी भूमिका रविकांत तूपकरांनी यावेळी घेतली.