spot_img
spot_img

मुलुखमैदानी तोफ धडाडली! -आठ सप्टेंबरला महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको! -आंदोलनाचा रेटा वाढवून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडणार! -रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची धडाकेबाज सुरुवात..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पिक विम्याचा पैसा खात्यात टाकण्यासाठी ‘तारीख ते तारीख’ दिली जातेय. ह्या आश्वासनांच्या तारखा संपल्या आता आपल्या आंदोलनाच्या तारखा सुरू झाल्या असून,हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा रेटा वाढवून केंद्र व राज्य सरकारला गुडघे टेकवायला भाग पडणार असल्याचा घणाघात शेतकरी रविकांत तुपकर यांनी आज सिंदखेडराजा येथील आंदोलनस्थळी केलाय.दरम्यान आठ सप्टेंबरला महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनकरण्याचा इशाराही दिला आहे.

सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची 100 टक्के नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, यासह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आज एल्गार पुकारला असून अन्न त्याग आंदोलनाला नुकतीच सुरुवात झाली. रविकांत तुपकर म्हणाले की,अंबानी अदानी यांचा उद्योग तोट्यात गेला म्हणून राईट अप च्या नावाखाली त्यांना कर्ज माफ केले.परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही.सत्ताधारी यांना शेतकऱ्यांचा कळवळा नाही.निवडणूक जवळ आली म्हणून पुढार्‍यांच्या अवलादी आश्वासनांची खैरात वाटणार.परंतु शेतकऱ्यांनी या ढोंगी नेत्यांना ओळखले पाहिजे.आपला नेता केवळ सोयाबीन आहे.या अन्नत्याग आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस असून,आंदोलनाचा रेटा वाढविणे गरजेचे आहे.मध्यप्रदेश मध्ये देखील सोयाबीनआंदोलन पेटले आहे. मध्यप्रदेशातील शेतकरी नेते सिंदखेड राजात दाखल होणार आहेत.महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील सोयाबीन आंदोलन होणार असून,महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलनाचा रेटा वाढविल्या जाणार आहे,असेही रविकांत तुपकर यांनी यावेळी म्हटले.या अन्नत्याग आंदोलनाला बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी नेते व शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!