देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) एका कार ने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सावरखेड भोई फाटा बायपास रोड देऊळगाव राजा येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश तेजराव जाधव (34) रा.सावरखेड भोई ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा हे जखमी झाले.
राजेश जाधव हे एमएच 28 बी एल 5007 क्रमांकाच्या दुचाकीने सावरखेड भोई फाट्याजवळ बायपास मार्गावरून जात असताना,मागून भरधाव येणाऱ्या एम एच 02 सी पी 0674 क्रमांकाच्या कार ने वाहन निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश जाधव जखमी झाले.त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून मणक्यातही दुखापत झाली आहे.याप्रकरणी जाधव यांनी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी कार चालका विरुद्ध कलम 281,125(ए) 125 (बी) एन एस नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार संतोष महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ चव्हाण करीत आहे.










