बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेश उत्सवाच्या काळात महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीची अर्थात लालपरीची आज चाके थांबलीत. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज 3 सप्टेंबरला बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आल्याने बुलढाणा बस स्थानकावर शुकशुकाट दिसून येत आहे.
एसटी कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याएवढे करावे या प्रमुख मागणीसह इतरही मागण्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने रेटल्या आहेत. जीव धोक्यात घालून वाहक एसटी चालवितात.परंतु त्यांना दिले जाणारे वेतन हे कमी असल्याचे सांगण्यात येत असून 3 सप्टेंबर पासून एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.दरम्यान सण उत्सवाच्या काळात एसटी सेवा बंद झाल्याने चाकरमाने आणि प्रवाशांची मोठी गैरसोय दिसून येत आहे.परंतु खाजगी वाहनांची चांदी होत असल्याचे चित्र आहे.