spot_img
spot_img

धोक्याची घंटा! -जलसाठ्यातील पाणी रस्त्यावर! -खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा – येळगाव पुलावरून पाणी!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) खडकपूर्णा प्रकल्पाच्या अनलॉक क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा नदी व उपनद्या प्रचंड प्रवाहाने वाहत आहे.त्यामुळे कोणतेही वेळी धरणाचे वक्राकार दरवाजे उघडू शकतात. परिणामी नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलढाणा तालुक्यातील येळगाव धरण तुडूंब भरले असून पाण्याचा जोरदार प्रवाह पुलावरून प्रवाहित झालाय. त्यामुळे बुलढाणा- चिखली मार्ग धोक्याची घंटा देत आहे.

खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहने वाहत आहे. खडकपूर्णा पाणलोट क्षेत्रातून येणारा येवा व पाणलोट क्षेत्रातील होणाऱ्या पर्जन्यमानानुसार धरण परीचलन सूची अंतर्गत पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता यापुढे कधीही धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून पाणी सोडण्याची गरज पडणार आहे. करिता खडकपूर्णा नदी काठच्या गावांतील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे,असा इशारा पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.दरम्यान बुलढाणा तालुक्यातील धाड, मासरूळ, साखळी बु, देऊळघाट सर्कलमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्याने मासरूळ, धाड, ढालसावंगी, बोधेगाव, गुम्मी, येळगांव या सर्व सर्कलमधील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे.

अजूनही पावसाची रिपरिप सुरुच आहे. बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारे येळगांव धरणाचे सर्वच दरवाजे खुलले असून लहान वाहनांची वाहतूक बंद झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!