बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जयस्तंभ चौकातील आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाला ‘अड्डा ‘ संबोधणाऱ्या ‘भल्या माणसाच्या’ वक्तव्याचा निषेध आज गायकवाड यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला आहे.
पोलीस गाडी धुत असल्याच्या प्रकरणाचे शिंतोडे उडतच आहेत. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालयाला अड्डा संबोधून ‘माफ करा’ म्हणत शब्द मागे घेतला होता.परंतु यावर गायकवाड समर्थकांनी आमच्या पवित्र कार्यालयाला अड्डा म्हटल्याने सपकाळ यांचा विकृत मनोवृत्तीचा माणूस म्हणून निषेध नोंदवला आहे. आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक म्हणाले की, ज्या ठिकाणी माता-भगिनींचे,
गोरगरिबांचे, निराधारांचे सदैव अश्रू पुसण्याचे काम धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड करत असतात, अशा मंदिरासारख्या मातोश्री कार्यालयाचा त्यांनी अड्डा म्हणून अपमान केलेला आहे, त्याच्या विकृत मनोवृत्तीचा जाहीर निषेध करीत आहोत.