मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) आज रास्ता रोको आंदोलन करताना आमदार राजेश एकडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना करताच आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सोमवार पर्यंत मिळणार असल्याचे आश्वासित करण्यात आले आहे.
आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी १३ दिवसा पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य झाल्या नसल्याने त्यांनी आज रस्ता रोको व उग्र आंदोलन केले. आंदोलनाला आमदार राजेश एकडे यांनी भेट दिली व उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून येत्या सोमवार पर्यंत प्रस्ताव तपासून कोळी समाजाचे प्रश्न त्वरित सोडवण्यात यावे अशा सूचना केल्या. उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रस्ताव तपासून सोमवार पर्यंत कोळी बांधवांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले.या प्रसंगी डी.वाय.एस.पी. गवळी, तहसीलदार राहुल तायडे,ठाणेदार गणेश गिरी, संतोष रायपुरे, अरुण अग्रवाल,राजू पाटील, बंडू चौधरी, कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम झाल्टे उपस्थित होते.