बुलडाणा (हॅलो बुलढाणा) आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपातुन सत्र खटला 30/2023 दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या बाबतचा न्याय निर्णय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा मा. श्री. स्वप्नील खटी यांनी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी दिला. आहे. सदर प्रकरणात अँड धिरजकुमार गोठी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4 नोव्हेंबर 2019 रोजी सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 चे पती रा.अंढेरा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध अप क्रमांक 377/2019 च्या कलम 306,506,34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदरचे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समक्ष चालविणात आले.
सदर प्रकरणात साक्ष पुरावे व आरोपींचे विधीज्ञ यांचा प्रभावी युक्तिवादयाची अवलोकन करून सदर प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली.आरोपी याच्या बाजुने अँड धीरजकुमार गोठी यांनी सत्र खटला 30/23 मध्ये प्रभावी युक्तिवाद करत सदर प्रकरणातील दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. या बाबत चा न्याय निर्णय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा श्री स्वप्नील खटी यांनी शुक्रवार दिनांक 30ऑगस्ट 2024 रोजी दिला. आरोपी तर्फे अँड धिरजकुमार गोठी यांनी काम पाहिले त्यांना अँड जिवन गवई, अँड रहीम शाह, अँड धिरज वावरे, पवन सरकटे, उमेश गाडेकर यांनी मदत केली.