बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अत्यावश्यक शेती प्रश्नांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाला विविध मागण्या रेटून मागण्यांची पूर्तता न झाल्यास 4 सप्टेंबर पासून सिंदखेड राजा माँ जिजाऊ जन्मस्थानाच्या राजवाड्या समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस पिकाला दरवाढ नाही.हक्काच्या पिक विम्यापासून ते वंचित आहेत.शेतीला कंपाउंड नाही.शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही.या सर्व मागण्या घेऊन शासनाला 3 सप्टेंबर पर्यंत आम्ही मुदत दिली असून मागणीपूर्ती न झाल्यास 4 सप्टेंबरला माँ जिजाऊ जन्मस्थळांच्या समोर सिंदखेडराजात बेमुदत अन्यत्याग आंदोलन करणार आणि सोबत हजारो शेतकरी असतील,सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही असे रविकांत तुपकरांनी मीडियासमोर स्पष्ट केले.पुढे ते म्हणाले की, आज 3800 रुपयांनी सोयाबीन विकले जातेय. साडेसात हजार सोयाबीन उत्पादनाला खर्च येतो त्यामुळे सोयाबीनला किमान 7000 रुपये तर कमाल 100 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. कापसाला 10 ते साडेबारा हजार रुपये भाव मिळावा.मार्च महिन्यापर्यंत शंभर टक्के हक्काचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो मिळालेला नाही.महाराष्ट्रात शेती उद्योग तोट्यात चालला आहे.मात्र अंबानी अदानींचे कर्ज जसं माफ होतं तसं शेतकऱ्यांच्या कर्ज माफ का होत नाही.हवालदील झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी अशा आमच्या मागण्या आहेत.ह्या मागण्या घेऊन आम्ही लढाई लढणार आहोत,असे तुपकरांनी सांगितले आहे.