बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांची खाजगी गाडी पोलिसांनी धुतल्याचे प्रकरण तापत असून,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची री ओढली..
‘एकेकाळी विविध गुन्हे दाखल होऊन वेगवेगळ्या दंगलीत ज्यांचा सहभाग होता त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना पाहून पळणारा माणूस आज जर पोलिसांना गाडी धुवायला ठेवतोय तर याला सत्तेचा माज म्हणावे लागेल’अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.
जस्तंभ चौकातील आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयासमोर त्यांची गाडी पोलीस धुत असतानाचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक अकाउंट वरून व्हायरल केला होता. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला होता. एकीकडे बदलापूर सारख्या दुर्दैवी घटना घडत असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी मात्र प्रयत्न होताना दिसून येत नाही उलट आमदार संजय गायकवाड म्हणतात की,लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतील तर मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदाराचं काम करायचं का?
आरोपींच्या घरी एसपींनी चौकशीसाठी बसायचे का? असे बेताल वक्तव्य आमदार करीत आहेत. पोलिसांनी महिलांचे संरक्षण सोडून वरली,मटका, गांजा बंद करणे सोडून गाडी धुण्याचा नवा धंदा सुरू केला आहे आणि हे अत्यंत संतापजनक स्वरूपाचे आहे. एक काळ असा होता की,आमदारावर विविध गुन्हे दाखल होऊन वेगवेगळ्या दंगलीत त्यांचा तत्कालीन सहभाग होता त्या पार्श्वभूमीवर पडणारा माणूस आज जर पोलिसांना गाडी धुवायला ठेवतो यातून सत्तेचा मार्च दुर्दैवाने बघावा लागत आहे ही बाब गंभीर असून वेळीच प्रशासनाने आळा घालावा,असेही माझी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना सांगितले.