spot_img
spot_img

सुषमाताईंना डॉ. बाबासाहेब अंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहिर! -छत्रपती संभाजी नगर येथे स्त्रीवादी साहित्य संमेलनात होणार सन्मान

देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा) छत्रपती संभाजीनगर येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊळगाव राजा येथील

मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमाताई राऊत यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा सन्मान छत्रपती संभाजी नगरीत स्त्रीवादी साहित्य संमेलनात दि.31 ऑगस्ट रोजी होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून देऊळगाव राजा शहरात उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून आपल्या निर्भिड, निपक्ष लेखणीने अनेक शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत न्याय देण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यांच्या पत्रकारतील कार्याची दखल छत्रपती संभाजी नगर येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाने घेतली आहे. पत्रकार सुषमाताई राऊत, उन्मेश देशपांडे, प्रकाश जोशी, सतीश अनवेकर, विद्या गावंडे, अपूर्वा जळणीकर, उज्वला साळुंके, पुरथावीर, भाग्यश्री जगताप या सर्व पत्रकारना दि.31 ऑगस्ट रोजी पुरोगामी स्त्रीवादी साहित्य संमेलन 2024 मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ.छाया महाजन, प्रसिद्ध लेखिका वैशाली हळदणकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे, स्वागत अध्यक्ष प्रवीन जाधव यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!