4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

प्रेरणादायी! विलास मोहितेंच्या ‘दृष्टीदानाने’ होईल उजेडाची पेरणी! -मरणोत्तर केले नेत्रदान! -नाभिक समाज बांधवांचीही ‘दूरदृष्टी’..आधीच केला नेत्रदानाचा संकल्प!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा / संतोष जाधव) शहरातील व्यावसायिक विलास मोहिते यांचे दिनांक 28 ऑगस्ट रोजी ब्रेन ह्याम्रेज मुळे दुःखद निधन झाले मृत्यु पश्र्चात त्यांची मुले राहूल व पवन यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व सन्मती जैन व सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेजुळकर यांना याची माहिती दिली वरून जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमुने येऊन विलास मोहिते यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले मृत्यू समयी त्यांचे वय 54 वर्षाचे होते, शहरातील नाभिक समाजाच्या सर्व समाज बांधवांनी यापूर्वीच मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे ज्या ज्या वेळी या समाजातील व्यक्तीचे निधन होते त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठीं पुढाकार घेतात हे फार महत्वाचे असुन यांचा आदर्श इतर समाजाने घेतल्यास ही चलवळ अधिक गतिमान होउन भारतातील अंधांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!