बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धूत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवरून व्हायरल केला होता.’कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला.यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील तोंडसुख घेतले.दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की,विरोधक रिकामचोट उंदऱ्या दानवेला काही काम नाही.पोलिसाने गाडी का धुतली याचं कारण जाणून घ्यायला पाहिजे. पहाटे पाच वाजता मला फोन आला.बुलढाणा शहरात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,बाजीप्रभू देशपांडे यांची पुतळे आणायचे होते.परंतु सिल्लोड येथे गाडीला प्रॉब्लेम आला कोणीतरी ती गाडी अडवली.त्यामुळे मला फोन आल्याने मी सिल्लोडला एकटा गाडीने गेलो.पुतळे शहरात आणल्यानंतर माझ्या ड्युटीवर असलेल्या मुळे हा पोलिस शेगाव वरून कामानिमित्त गेलेल्या मुळे तो रात्री उशिरा आला. त्यांनी धाड नाक्यावर काही नाश्ता केला.मी त्याला सांगितले असा नसता करत नको जाऊ.माझ्यासोबत गाडीत असताना त्यांनी ओकारी केली.गाडीसह मलाही भरवले.नंतर गाडीचे ड्रायव्हरने या पोलिसाला म्हटले तू उलटी केली तूच गाडी साफ करून दे.त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडी धुवून काढलीअसे आमदारांनी ‘हॅलो बुलढाणा’ ला सांगितल