spot_img
spot_img

पॉलिटिक्स विशेष! ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ -सिद्धार्थ खरातांच्या मानगुटीवर आमदारकीचं भूत!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निवडणूक लढविण्याचा प्रत्येकांना हक्क आहे.परंतु एकही कार्यकर्ता पाठिमागे नाही.. मेहकर विधानसभा मतदारसंघाशी काडीचा संबंध नाही..एक-दोन लुचाट पत्रकारांना हजार पाचशे द्यायचे अन् हीतभर पेपरात फक्त खमंग बातम्या पेरायच्या..प्रसिद्धी मिळवायची..

आणि ‘आमदारकीला उभे राहणार’ असं
एकच तुणतुणं वाजवायचं…कोण काय म्हणेल याची परवा करायची नाही असे मूळ सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावचे सिद्धार्थ खरात यांच्या बाबतीत घडत आहे. ते आगामी मेहकर विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्वप्न पाहताहेत.’मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणाऱ्या या खरातांना दोन-चार खाऊ साहित्यिकांनी निवडणूक लढवण्यासाठी उचकावल्याचे बोलले जात आहे.
नितीन राऊत पशुसंवर्धन मंत्री असताना सिद्धार्थ खरात हे त्यांचे खाजगी सचिव होते.त्यांनी उत्कर्ष फाउंडेशन द्वारे समाजसेवेचा आव आणला. त्यांनी आपल्या उत्कर्ष फाउंडेशनसाठी कोट्यावधी रुपये मिळवून घेतले. परंतु या रुपयांमधून उत्कर्ष फाउंडेशनच्या चळवळीतील एकाही कार्यकर्त्याला उभारी दिली नाही.स्वतःच्या समाजातील लोकांना डावलून इतरच लोकांनी आपला उत्कर्ष करून घेतला.
पद भोगत असताना एकाही कार्यकर्त्याला किंवा चळवळीला कवडीचा फायदा झाला नाही. सिद्धार्थ खरात यांच्या उत्कर्ष फौंडेशनच्या माध्यमातून मेहकर मतदार संघात एकही समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आला नाही किंवा त्यांचे सामाजिक दातृत्व कुणाला लाभलेले नाही,अशी ही चर्चा रंगत आहे. आता सिद्धार्थ खरात नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत दिसत आहेत.त्यांनी तिकीट मिळविण्यासाठी उबाठा शिवसेनेकडे साकडे घातल्याचे समजते.राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या वरदहस्तामुळे आमदार संजय रायमुलकर सध्या विद्यमान आमदार आहे. खा. जाधवांची मजबूत पकड असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ खरात आगामी निवडणूक लढविण्यासाठी कामाला लागले आहेत.डोक्यात आमदारकीची हवा शिरलेल्या सिद्धार्थ खरात यांचे हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पूर्ण होते काय? की डिपॉझिट गोल होऊन खरात चारी मुंड्या चीत होतात? ही येणारी वेळ मात्र निश्चित सांगणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!