बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे ) पावसाळ्यात साथ रोगाचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी विभागाने मलेरियाच्या दृष्टीने आतापर्यंत तब्बल 3 हजार 842 डासोत्पतीस्थानात गप्पी मासे सोडले तर 159 गावात प्रतिबंधात्मक फवारणी केली. तसेच 901039 घरांची तपासणी करून 71258 घरांमध्ये डासअळी आढळल्याने तेथे अळीनाशक टेमीफॉस टाकण्यात आले आहे.
जिल्ह्यात एक जानेवारी ते ऑगस्ट 2024 दरम्यान एकूण 47 डेंग्यूचे तर चिकनगुनियाचे 16 व हिवतापाचा एक रुग्ण आढळून आला आहे. परिणामी संशयित व निश्चित 159 गावांमध्ये प्रतिबंधात्मक धूर फवारणी करण्यात आली.सात रोगा आजारासंदर्भात लोक जागृती करीत 901039 घरांची तपासणी करण्यात आली.त्यापैकी 71258 घरांमध्ये डासअळी आढळली. घराघरातील 2386310 भांडी तपासली असता,219747 भांड्यांमध्ये डास अळ्या निदर्शनास आल्या. पैकी 216917 भांडी रिकामी करण्यात आली.2827 भांड्यांमध्ये अळीनाशक टेमीफॉस टाकण्यात आले.हिवतापाच्या दृष्टीने 3842 डासोत्पती स्थानात गप्पी मासेसोडण्यात आले आहे.
▪️जिल्हा हिवताप अधिकारी म्हणाले..
नागरिकांनो आरोग्याची काळजी घ्या! प्रत्येक रविवारी कुटूंबासाठी 10 मिनिटे नक्की द्या. घरातील व आजुबाजुचा परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करा.घरातील वा परिसरातील कानाकोपरा, गच्चीवर शोधा व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा. अडगळीच्या वस्तु, भंगार, जूनी माठ- रांजन इत्यादी नष्ट करा जेणेकरुन डासोत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाही. परिसरातील डबके वाहते करा,बुजवा किंवा त्यामध्ये जळालेले ऑईल टाका किंवा गप्पी मासे सोडा. घरातील सर्व पाणीसाठे नियमित स्वच्छ व कोरडे करा आदी उपाययोजना आरोग्य जपा असे जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौव्हाण म्हणाले.














