बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत विविध समस्या निकाली काढण्यासाठी आमदार धिरज लिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कार्यालय)यांच्या सोबत आमदार धिरज लिंगाडे यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. संबंधित विभागाचे खाते प्रमुख तसेच विविध शिक्षक संघटनेतील पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत . आमदार धिरज लिंगाडे हे सातत्याने मतदार संघात दौऱ्यामध्ये असतांना विविध ठिकाणी भेटी देतांना अनेक शिक्षक तसेच शिक्षक संघटनांच्या विविध समस्या सोडवत असतात, पण ज्या समस्यांची उकल मंत्रालय स्तरावर होऊ शकते, अशा समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने बैठका लावत असतात. त्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली आहे. ज्या शिक्षकांना आपल्या प्रशासकीय स्तरावरील समस्या निकाली करून घ्यायच्या असतील त्यांनी आपले प्रश्न, समस्या संघटना प्रमुखांकडे अथवा मोबाईल क्रमांक ९७६७९२८०७० यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Hellobuldana