मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) दिव्यांग, विधवा, निराधार , घरेलू कामगार यांना ‘लाडकी बहीण योजनेतून’ वगळण्यात आले हा अन्याय नाही का? त्यांना शासनाचे नाममात्र अर्थसाह्य मिळत असले तरी,त्यांचे जगणे अत्यंत संघर्षमय आहे.या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांचा ‘लाडकी बहीण योजनेत’ समावेश करावा अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूरने केली आहे.यासंदर्भातील निवेदन आज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या’ लाभ सर्वमहिलांना देण्यात येत आहे. मात्र दिव्यांग, विधवा, निराधार, घरेलू कामगार यांना वगळण्यात आले. हा अन्याय आहे.या दुर्बल घटकांचा सदर योजनेत समावेश करावा त्याही लाडक्या बहिणी आहेत. वाढलेल्या महागाईत त्यांची गुजराण होत नाही. कष्टकरी कामगार महिलांचे जीवन असुरक्षित असून पतीच्या निधनानंतर त्यांना
अनेक संकटाला सामोरे जावे लागते
जगण्यासाठी धडपड म्हणून ते
कुठेतरी काम शोधतात,मात्र कामाची हमी नसते अशा दिव्यांग, निराधार उपेक्षित, कष्टकरी
महिला,घरेलू,विधवा महिलांना शासनाचे अत्यल्प अर्थसाह्य मिळते परंतु ज्यांचे कुटुंब सधन आहे, ज्यांच्या कुटुंबात अनेक व्यक्ती कमावती आहे. यांची तुलना या दुर्बल घटकांशी शकत नाही. त्यामुळे या सर्व दुर्बल घटकांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे करण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे,महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पंकज मोरे,गणेश ठाकूर मलकापूर तालुकाध्यक्ष निलेश अढाव, मलकापूर तालुका सचिव रामेश्वर गारमोडे,महाराष्ट्र सहसचिव संतोष गणगे,सदस्य अंकित नेमाडे, अशोकभालशंकर, जफर खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.