spot_img
spot_img

आमदारांची जीभ झाली ‘तिखट!’ -काय म्हणाले संजय गायकवाड?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुम्ही निकटवर्तीय..तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी झटताय..सर्वाधिक निधी देखील खेचून आणता..पण कधीकधी तुमचे शब्दशस्त्र वादग्रस्त ठरते! नुकतेच तुम्ही बदलापूर प्रकरणावरून केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले असून,अनेकांनी या वक्तव्याला ‘असंवेदनशील’ म्हटले आहे.त्यामुळे आमदार संजय गायकवाड साहेब जिभेवर ताबा ठेवावाच लागेल!

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडूनविविध प्रतिक्रिया समोर येत असताना, बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पत्रपरिषदेत याबाबत प्रतिक्रिया दिली आणि या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गायकवाड यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.

▪️ काय म्हणाले संजय गायकवाड? 

“आता मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पाहारा देणार आहेत का? महाराष्ट्राचे एसपी (पोलीस निरीक्षक) हे त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत का? किंवा मग आरोपी सांगतो की मी बलात्कार करतोय, मला पकडायला ये? असं ते सांगतात का? या घटना घडत असतात, त्याच्यासाठी यंत्रणा आहे. पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांकडून नाही झालं तर सीबीआयवाले करतात. सीबीआयकडून नाही झालं तर एसआयटी करते, पण आरोपीला सोडत नाही. त्यामुळे अशा घटनांचे राजकारण करण्यापेक्षा या नराधमांना कशी शिक्षा मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. ते प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसत नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!