मेहकर (हॅलो बुलढाणा/सुभाष नरवाडे) सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत असलेल्या राज्यमार्ग व प्रमुख मार्गावरील खड्ड्याबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी शासनाने पीडब्ल्यूडी ॲप विकसित केला आहे. या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गावरील खड्डे मुक्त योजना राबविण्याचे आवाहन मेहकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जगन दांदडे यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असलेल्या राज्यमार्ग व प्रमुख मार्गावरील खड्ड्याबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी पीडब्ल्यूडीचे ॲप तयार करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदविता येणार आहे. या तक्रारीचे निराकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम अभियंता जगन दांदडे यांनी दिली.
त्यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची गरज पडणार नसून संबंधित राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविले जातील असेही उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम अभियंता जगन दांदडे यांनी सांगितले.