spot_img
spot_img

दुःखद बातमी! ज्येष्ठ पत्रकार हाफिज खलील उल्लाह शेख यांचा आज अंत्यविधी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ज्येष्ठ पत्रकार, समजसेवक तथा जमियत उलमा ए हिंदचे जिल्हा अध्यक्ष हाफ़िज़ खलील उल्लाह शेख यांचे हार्ट अटॅकने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज 27 ऑगस्टला मलकापूर रोडवरील कब्रस्थान येथे होणार आहे.

हाफ़िज़ खलील उल्लाह शेख यांचे आज भिवंडी, मुंबई येथे हार्ट अटॅकने निधन झाले. ANI चे जिल्हा प्रतिनिधि तसेच लोकमत समाचारचे पत्रकार क़ासिम शेख यांचे ते वडील होते.हाफ़िज़ खलील उल्लाह शेख समाजसेवेत अग्रेसर होते.प्रत्येकांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी झटणारे हे लोकप्रिय व्यक्तिमत्व होते.कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली. पत्रकार बांधवांना गुणकारी काढ्याचे वाटप केले होते. आज मंगळवार 27 ऑगस्ट रोज़ी मलकापुर रोड येथे मुस्लिम कब्रिस्तान येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. डॉल्फिन पुलाच्या मागे खालिद बिन वालिद नगर येथे अल-मदीना अपार्टमेंट मधून त्यांची अंतिम यात्रा 27 ऑगस्टला दुपारी निघणार आहे.

‘हॅलो बुलडाणा’ परिवाराकडून भावपूर्ण  श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!