बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्या महायुतीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला सैराट सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरू परश्यासाठी नव्हे तर चिखलीतील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी येणार आहे.सोबत अभिनेत्री जरीन खान सुद्धा या उत्सवात दाखल होणार असल्याने हा दहीहंडी सोहळा तरुणाईसाठी पर्वणी ठरणार आहे.
सध्या राज्यात दहीहंडी उत्सवाला राजकीय तोरण बांधल्या जात आहे. सेलिब्रिटींना बोलावून सोहळा साजरा करण्यात येतोय. चिखलीत देखील दरवर्षी पारंपारिक दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होतो. यंदाही आमदार श्वेता ताई महाले यांच्या संकल्पनेतून भाजपा युवा मोर्चा तर्फे दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा सोहळा साजरा होणार. ‘गोविंदा आला रे आला… जरा मटकी संभाल ब्रिजबाला!’ असा नारा देत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा थरांवर थर लागणार. विशेष म्हणजे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु व अभिनेत्री जरीन खान हा उत्सव जल्लोषमय करणार आहेत.या दहीहंडी उत्सवाचा नागरिकांनी आनंद घ्यावा,असे आवाहन आमदार श्वेता महाले तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.