spot_img
spot_img

‘पाणीदार येळगाव धरणाचे झाले जलपूजन!’ -आमदार गायकवाड म्हणाले.. येणाऱ्या काळात पाणी प्रश्न कायमचा मिटविणार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) उशाला असलेल्या येळगाव धरणाने गेल्या वर्षी घशाला कोरड पाडण्याची वेळ आणली होती परंतु तशी वेळ आली नाही.परंतु यंदा श्रावणातच येळगाव धरण 100% भरल्यामुळे

पाण्याची चिंता मिटल्याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात यापेक्षा दुपटीचे धरण निर्माण करून पाणी प्रश्न कायम मिटविणार आहे.आता धरण भरल्यामुळे दिवाळीपर्यंत नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आम. संजय गायकवाड यांनी दिली.

आज येळगाव धरण 100% भरल्याने नगरपालिकाच्या वतीने जलपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार गायकवाड बोलत होते. त्यांनी सपत्नीक जल पूजन केले.ते पुढे म्हणाले की, येळगाव धरण
सव्वालाख बुलढाणा शहर व परिसरवासियांना पाणीपुरवठा करते.गेल्या वर्षी हे धरण 80 टक्के भरले होते.त्यामुळे पाण्याची चिंता वाढली होती.परंतु तशी वेळ आली नाही.यावर्षी श्रावणातच धरण ओव्हर फ्लो झाले आहे.धरणातील गाळ काढल्याने जलसाठ्याची स्टोरेज कॅपिसिटी वाढली आहे.येणाऱ्या काळात यापेक्षा दुपटीचे धरण निर्माण करण्याचा मानस आहे.त्यामुळे शंभर वर्ष तरी पाणी प्रश्न उद्भवणार नाही.दिवाळीपर्यंत नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे गायकवाड म्हणाले.

▪️मुख्याधिकारी पांडे काय म्हणाले? 

खडकपुर्णावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.सहा महिन्यात हे काम पूर्णत्वास जाईल,त्यामुळे खडकपूर्णा येथील आणि येळगाव धरणातील पाणी नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध होणार आहे,असे याप्रसंगी मुख्याधिकारी गणेश पांडे म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!