बुलढाणा (हॅलो बुलडाणा/राजेंद्र घोराडे) मुळात निवडणुका आल्या की निवडणुकीच्या अनुषंगाने चांगल्या वाईट बातम्या येत राहतात, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला कधी नव्हे ते एवढे महत्व आमदार संजय गायकवाड यांना आमदारकी मिळाल्यानंतर मिळाले आहे.संजय गायकवाड यांची आक्रमक कार्यशैली,एक आमदार एका कार्यकाळात किती कामे करू शकतो याची त्यांच्या विरोधकांना देखील धडकी भरली आहे.
त्यांनी केलेली बेधडक वक्तव्ये, जे पटत नाही ते तोंडावर…..! पत्रकार असो की राजकारणी सगळ्यांची इज्जत चवाठ्यावर मांडायला आमदार संजय गायकवाड कधी मागेपुढे पाहत नाही.”सकारात्मक” या नावाखाली संजूभाऊंना पांचंटपणा कधी आवडत नाही म्हणून अगदी शिवजयंतीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही संजूभाऊंनी “ताब्यात” घेऊन ब्रँड व ग्रेट बनवले.आणी त्याच कार्यक्रमात एकाचा पोलिसाच्या दांड्यानेच कार्यक्रमही केला.
अशा आमदार संजय गायकवाड यांची कार्यशैली ही विवादित असेल, पण आमदार संजय गायकवाड यांच्या याच कार्यशैलीमुळे ते युवकांमध्ये कमालीचे प्रसिद्ध आहेत.अशा संजय गायकवाड यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसकडून जयश्री शेळके व संजय राठोड तर उबाठा कडून जालिंदर बुधवत यांनी तयारी केली आहे.
वरील तीनही उमेदवार पैशाने गडगंज नक्कीच आहेत,पण तरीही संजय गायकवाड यांच्या विरोधात निवडून येण्याची क्षमता या निकषावर बघायचे झाले तर जालिंदर बुधवत यांचेकडे ठेकेदारीतून मिळालेला बक्कळ पैसा नक्कीच असेल पण जातीय आधारावर ते कमजोर ठरतात.त्याचप्रमाणे त्यांनी काही दिवसापासून सुरु केलेल्या भेटिगाठी त्यांच्यासाठी काही विशेष जादु घडवून आणतील याची शक्यता नाही.” आमदार संजय गायकवाड यांच्याशी त्यांची अजूनही मैत्री घनिष्ट मैत्री बघता(आ. संजूभाऊबद्दल ते एखाद्या सभेत नाव घेऊन बोलले असल्यास आम्हाला पाठवावे) ते संजय गायकवाड यांच्यासमोर,संजूभाऊंनीच उभे केलेले उमेदवार वाटतात.तसेच त्यांना पक्षातून सहकार्य मिळण्याची शक्यताही जवळजवळ नाहीच.कदाचित तेवढ्यासाठीच “सुनिलभाऊंनी संदीपदादा” इकडे पाठवले असावेत.
दुसरे स्वतःला प्रमोट करणारे उमेदवार संजय राठोड हे छोटे मुकुल वासनिक आहेत,त्याच चाली,तसेच राजकारण,स्वतःच्या समाजातील काही लोकांना धरून चालायचे,शिक्षणसंस्था मधून बक्कळ पैसा हाताशी धरून चालणारे संजय राठोड यांना स्वतःला देखील कल्पना असावी की जिल्हा परिषद सदस्याला मिळणारे मते देखील त्यांना मिळू शकणार नाहीत,पण स्वतःची बार्गेनिंग पावर वाढवण्यासाठी मुद्दाम त्यांनी उमेदवारीची बातमी वाढदिवसाला पेरली? असा एक प्रश्न निर्माण होतो.संजय राठोड यांना जातीय समीकरनामध्ये पास होण्याइतपत देखील मार्क मिळू शकत नाही,विशेषतः बंजारा समाजातील त्यांनी गृहीत धरलेली मते देखील कधीच आ. संजूभाऊंनी त्यांच्या खिशात टाकून घेतली आहे,हे कळण्याईतपत संजय राठोड नक्कीच अजाण नाहीत,त्यामुळे त्यांच्या उमेदवारिची बातमी ही लोकसभेमध्ये भाईजी भाजपच्या तिकिटावर उभे राहणार आहेत या बातमीईतकीच खरी असण्याची शक्यता आहे.
आता खरे म्हणजे आ. संजय गायकवाड आणी जयश्री शेळके यांची एकास एक या पद्धतीने निवडणूक झाली तर जयश्री शेळके या निवडून येण्याची शक्यता खूप जास्त आहे.सुनील शेळके यांनी ज्या नैसर्गिक वाटणाऱ्या पद्धतीने जयश्री शेळके यांच्यासाठी जमीन तयार केली आहे,ते पाहता सुनील शेळके यांच्या बुद्धीमत्तेबद्दल प्रचंड आदर निर्माण होतो.स्वतः व्यावसायिक असल्याने आर्थिक क्षमता प्रचंड,नातेवाईक व जातीय आधार आहेच,सोबत “महात्मा फुले” व “बाबासाहेब आंबेडकर” यांच्यावर एक एक चित्रपट बनवला म्हणजे बहुसंख्य माळी समाजाची व अनुसूचित जातीची मते आपल्याकडे वळवित एक सॉफ्ट कॉर्नरही तयार केला आहेच, सोबत ओबीसी कर्मचारी महासंघाची स्थापना व संगोपन करून ,महसूल कर्मचारी व इतर अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध कार्यक्रमातून भेटिगाठी घेणे हा खेळ एक बुद्धीने मोठा अधीकारीच खेळू शकतो सोबतच संदीप शेळके उबा ठा मध्ये रीतसर प्रवेश घेऊन “उबाठा” एनवेळी धोका देणार नाही याची काळजी घेण्यासाठी संदीप शेळकेना अंतर्गत परीक्षक म्हणून पाठवले गेले असावेत ?स्वतः जयश्रीताई नेहमी सामाजिक भेटिगाठी घेऊन तत्पर आहेतच म्हणजे जयश्रीताई यांच्यासाठी सगळी विनवीन सिच्युएशन असतानादेखील काँग्रेसकडे बुलढाणा मतदारसंघ सुटण्याची शक्यता कमी आहे.उद्धव ठाकरे सेनेला हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे व लोकसभेप्रमाणेच निवडून येण्याची शक्यता नसलेल्या उमेदवाराला उबाठा उमेदवारी देण्याची शक्यता ही आहे.खर म्हणजे विधानसभेच्या या पेपरमध्ये फक्त पास होण्याची शक्यता जयश्री शेळके यांच्यात असली तरी त्यांना पेपराला बसू देतात की नाही हेच कळत नाही.आता जयश्रीताई उबाठा मध्ये प्रवेशीत झाल्या तर ठीक नाहीतर पुन्हा……म्हणून तर म्हणतोय………बिचाऱ्या जयश्रीताई