spot_img
spot_img

राक्षसी प्रवृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकारचा निषेध! -देऊळगाव राजात बांधल्या तोंडाला काळ्या पट्ट्या!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा)बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे व याचा तीव्र निषेध करण्यासाठी देऊळगाव राजा येथे 24 ऑगस्ट ला सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बस स्थानक चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठी महायुती सरकारचा निषेध केला.

याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गजानन काकड,शिवसेना तालकाप्रमुख (उबाठा)दादाराव खार्डे,राष्ट्रवादी (शरद पवार गट)सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष प्रमोद घोंगे, तालुकाध्यक्ष राजेश इंगळे,रमेश कायंदे,गोविंद झोरे, विष्णु झोरे,विजय खांडेभराड,अजय शिवरकर,मगर साहेब,गणेश डोईफोडे,हनीफ शहा, गजानन घुगे,शेख नाझिम, प्रा.अशोक डोईफोडे,नितेश देशमुख,पवन झोरे, राजेंद्र डोईफोडे,अतिश कासारे,दीपक कासारे,राजू नाडे,अनिल सावजी,विनय लंगोट,रवींद्र इंगळे,अंकुश घोंगे,निखिल जयभाये,मुन्ना ठाकुर मुबारक खान,सचिन मुंढे,सै.इरफान,सदाशिव मुख्यादल,किशोर जामदार,ज्ञानेश्वर शेळके,बालाजी घोडके,विठोबा पवार,प्रदीप शेळके,लिंबाजी मुखदल,मोहन खांडेभराड, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!