लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) जन्म देतांना भूतलावर मानव म्हणून एकट्याने यायचं की सोबत जुळा बहीण भाऊ आणायचा हे विधत्याच्या हातात असते. त्यातही जगण्याची सोबत किती दिवसाची हे त्या जुळ्याना माहित नसतं. मात्र आज उमद्या वयात जगत असतांना आज सहज सोपी नसणारी शासकीय नोकरीं मिळवणे म्हणजे फार मोठे अग्नीदिव्यच! एका सोबत काही मिनिटाच्या फरकाने जन्म घेणाऱ्या अमित सुमित या जुळ्या भावंडाना एकाच दिवशी एकाच वेळी शासकीय नोकरीची संधी मिळण्याचा अनोखा योगायोग आल्याने परिसरात याची अनोखी चर्चा रंगत आहे.
लोणार तालुका पत्रकार संघांचे उपाध्यक्ष शाम सोनुने यांची जुळे मुले अमित आणि सुमित सोनुने हे मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. अमित सोनुने सह अनेक विध्यार्थी यांना डी.एम. ई. आर. विभागाने नोंदणी प्रमाणपत्राचे कारण देत नोकरी चे गुणवत्ता यादीत नाव असूनही नोकरीचे आदेश दिले नव्हते. या साठी अमित सोनुने सह पात्र विध्यार्थी यांनी मॅट, मुंबई मध्ये ऍडव्होकेट अमोल चालक पाटील आणि ऍड. आशिष हजारी यांचे मार्फत राज्य सरकारला आव्हान दिले होते. त्याचा निकाल नुकताच अमित सोनुने यांचे बाजूने लागला होता. त्यानुसार अमित सोनुने सह इतर विध्यार्थी यांना दिनांक 19 ऑगस्ट
रोजी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदाचा नियुक्ती आदेश मिळाला.
तर सुमित सोनुने यांनी वाशीम ज़िल्हा परिषद अंतर्गत रिगमन पाणी पुरवठा विभाग जी. प. वाशीम पदासाठी आवश्यक कागद पत्रासह अर्ज सादर केला होता. एक जागा असताना तीन उमेदवार यांनी अर्ज सादर केले. यामध्ये सुमित सोनुने चे दुसऱ्या क्रमांकावर नाव होते. मात्र पहिल्या क्रमांकाचे उमेदवार यांनी मला दुसरी एक नोकरी असल्यामुळे मला ही नोकरी करावयाची नाही. असे लेखी पत्र दिले. त्यामुळे दिनांक 19 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी एकाच वेळी अमित आणि सुमित सोनुने यांना नोकरीची संधी मिल्यालाने अश्या योगायोग ची चर्चा सुरु आहे.
दोघा भावंडाचा तालुका पत्रकार संघांचे वतीने वडील शाम सोनुने व जुळे भावंड अमित सुमित सोनुने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भ अकडमी चे दोन्ही विध्यार्थी असल्यामुळे संचालक निसार शेख यांनी सत्कार केला.
यावेळी
पत्रकार संघांचे मार्गदर्शक डॉ. अनिल मापारी , कार्याध्यक्ष गोपाल तोष्णीवाल, सचिव सचिन गोलेचा, प्रवक्त राहुल सरदार,कोषाध्यक्ष किशोर मोरे, सदस्य संदीप मापारी, पवन शर्मा, रेहमान नवरंगाबादी, सुनील वर्मा , प्रणव वराडे,आदि उपस्थिती होते.