spot_img
spot_img

दोन ‘दादांवर’ एमपीडीए कारवाईचा दंडूका ! – येरवडा कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पो.स्टे. मलकापूर शहर व हिवरखेड हद्दीतील 2 धोकादायक ‘दादांना’ 1 वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत दिलीप शेषराव चव्हाण व मलकापूर पोलीस ठाणे अंतर्गत शेख साबीर शेख अहमद अशिया ‘दादांची’ नावे आहे. ही कारवाई

एम.पी.डी.ए. कायद्याखाली करण्यात आली.याप्रकरणी जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांनी आदेश दिलेत.

आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणूक-2024, श्रावण मासातील धार्मीक कार्यक्रम, विवीध सण-उत्सव
लक्षात घेवून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरीकांच्या जिवीतास व मालमत्तेला कोणताही धोका निर्माण
होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी. बी. महामुनी यांनी
जिल्ह्यातील धोकादायक ईसमांची माहिती घेवून, त्यांचेवर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले
तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (एम.पी. डी.ए.) कारवाई करणेबाबत
अशोक लांडे, स्था. गु.शा. बुलढाणा तसेच सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी बुलढाणा जिल्हा यांना आदेशीत केले होते. पो.स्टे. मलकापूर शहर व पो.स्टे. हिवरखेड येथे विवीध गुन्ह्यांची नोंद असलेले धोकादायक ईसम यांचे विरुध्द
जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचे कोर्टामध्ये एम. पी. डी. ए. कायद्याखाली प्रकरण दाखल होते. त्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी
तथा जिल्हाधिकारी ‘बुलढाणा यांनी खालील धोकादायक ईसम यांचे विरुध्द 1 वर्षे कालावधी स्थानबद्धचा आदेश पारित केला आहे.

▪️दोघेही सध्या जिल्हा कारागृहात !

पो.स्टे. हिवरखेड धोकादायक इसम
दिलीप शेषराव चव्हाण 20/08/202401 वर्ष स्थानबद्ध स्थळ येरवडा कारागृह,वय 27 वर्षे रा. दधम पुणे.ता. खामगांव जि.बुलढाणा तसेच

पो.स्टे. मलकापूर शेख साबीर शेख अहमद
22/08/2024
01 वर्ष येरवडा कारागृह,
शहर वय 25 वर्षे रा.पुणे.
सायकलपूरा, मलकापूर
जि. बुलढाणा उपरोक्त नमुद दोन्ही धोकादायक इसमांना डिटेन करुन जिल्हा कारागृह, बुलढाणा येथे तात्पुरत्या स्वरुपामध्ये दाखल
करण्यात आले. सदर इसमांना येरवडा कारागृह, पुणे येथे स्थलांतरीत करुन स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

▪️यांनी केली कामगिरी

सदर प्रकरणी सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी
अधिकारी स्था. गु. शा. बुलढाणा, पोनि गणेश गिरी, सपानि ईश्वर वर्गे पो.स्टे. मलकापूर शहर, सपोनि. कैलास चौधरी पो.स्टे.
हिवरखेड, पोना, संजय भुजबळ स्था. गु.शा. बुलढाणा, पोना, महेंद्र नारखेडे पो.स्टे. हिवरखेड यांनी ही कामगिरी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!