spot_img
spot_img

100 कोटी निधी मंजूर! – रेल्वे मंडळ अंतर्गत विविध विकास कामांसंदर्भात डीआरएम कार्यालय भुसावळ येथे केंद्रिय मंत्री रक्षा खडसे यांनी घेतली आढावा बैठक

मलकापूर (हॅलो बुलढाणा/रवींद्र गव्हाळे) मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अंतर्गत रेल्वे विभागाच्या विविध विकास कामे व समस्यांसंदर्भात डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे माझ्या व डीआरएम श्रीमती इति पांडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्टेशन तसेच भुसावळ रेल्वे स्टेशन येथील प्रगतीपथावर असलेल्या विविध कामांचा व “पाचोरा जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्पाच्या भूसंपादन बाबत आढावा घेऊन, बोदवड तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या मंजूर असलेल्या जुन्या आलायमेंट नुसार काम करणे बाबत जिल्हाधिकारी जळगांव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून लवकर अडचणी सोडवून संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. सदर भूसंपादनासाठी शासनामार्फत 100 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरणगांव, निंभोरा, सावदा व रावेर ई. प्रमुख स्टेशनवर स्थानिक प्रवाश्यांच्या सोयीसाठी जास्तीतजास्त पॅसेंजर गाड्यांना थांबा देणेबाबत कार्यवाही होणे आणि अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर नव्याने बनविण्यात आलेल्या रोड अंडर ब्रिज (RUB) मुळे शेती शिवार किंवा गावठाण मध्ये पाणी साचून शेतकरी व ग्रामस्थांना त्रास होत असल्याने तत्काळ योग्यत्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

आचेगांव (भुसावळ) येथे RUB मुळे गेट बंद झाल्याने रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना अडचण येत आहे, त्यासाठी लवकर जमीन अधिग्रहित करून रस्ता उपलब्ध होणेसाठी कार्यवाही करावी, तसेच नांदुरा गेट नं.19 जवळ RUB साठी इस्टीमेट तयार असून काम सुरु करण्यात यावे आणि अनेक वर्षापासून मंजूर व भूसंपादन व तांत्रिक कारणामुळे प्रलंबित नांदुरा येथील रेल्वे उड्डाणपूल (ROB) च्या तांत्रिकt अडचणी सोडवून काम लवकरच चालू करणे बाबत सूचना केल्या.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!