मलकापूर (हॅलो बुलढाणा / रवींद्र गव्हाळे)बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ आणि देशातील हिंदू विरोधी कारवाया, भारत देशाविरोधी विद्रोह पेटवण्याचे काम करणार्यांच्या विरोधात मलकापुर बंदची हाक देण्यात आली होती.दरम्यान मलकापूर बनला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
आज सकाळ पासूनच सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. बंदला प्रतिसाद मिळालेला आहे. मलकापूर मधील सर्व हिंदू समाज बांधवांकडून उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला. निवेदन देताना माजी आमदार चैनसुख संचेती , अशांतभाई वानखेडे माजी नगरसेवक, बंडूभाऊ चौधरी माजी नगरसेवक उपस्थित होते.
बांगलादेश हिंदू बांधवांना त्रास दिला जात आहे. हिंदूच्या हत्या, माता-भगिनींवर बलात्कार आणि सक्तीने धर्मांतर केले जात आहे. या निषेधार्थ आणि भारत सरकारने बांगलादेशातील हिंदुंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करावी, बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलावे या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदु समाजाने २० ऑगस्टला मलकापुर बंदचा निर्णय घेतला होता. याला आज प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.छोटे दुकानदार तसेच व्यापारी वर्ग ने आपले दुकान बंद ठेवले व शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला व इतर धान्य न आणून मलकापूर बंदला आपला संपूर्ण पाठिंबा दिला.