बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बातमी उमटून पाच दिवस होत नाही तोच परिवहन मंडळाने बातमीची दखल घेतली.’हॅलो बुलढाणा’ सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटते,एकदा पुन्हा सिद्ध झाले.50 ते 60 विद्यार्थ्यांना आज लाल परी मिळाली.
‘मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थी लाडके नाहीत’? अशा शीर्षका खाली ‘हॅलो बुलढाणा ने’ बातमी प्रकाशित केली होती. बातमीचा सारांश असा की,
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरळीत सेवेसाठी दर सोमवार व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. परंतु प्रत्यक्षात ‘प्रवासी राजा दीन’ झाल्याचे अस्वस्थ चित्र आहे.मेहकर तालुक्यात ग्रामीण भागातील 50 ते 60 विद्यार्थ्यांचीही बसेस अभावी अद्यापही फरफट सुरू आहे.शिक्षणा पासून मुलांना वंचित ठेवणारे राज्य परिवहन महामंडळ कोण?असा संतप्त सवाल विचारला जात आहे.दरम्यान या बातमीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. 19 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पारडी गावांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची प्रशिक्षण बस आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.