देऊळगावराजा (हॅलो बुलढाणा) नगर परिषदेला राज्य शासनाकडून कामकाज चालवण्यासाठी 2010 च्या आकृतीबंधनुसार किती कर्मचारी आवश्यक आहे याबाबत यापूर्वीच मान्यता दिली होती जकात विभाग बंद झाल्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नप च्या इतर विभागात सामावून घेतले तर 2010 च्या आकृतीबंधानुसार वर्ग तीनचे नऊ पदे मंजूर होती तर 2010 मध्ये या नप मध्ये वर्ग 3 चे 15 कर्मचारी कार्यरत होते 2010 ते 2024 या कालावधीत वर्ग 3 चे 11 कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यामुळे वर्ग तीन ची 4 पदे रिक्त होती तर वरिष्ठ लिपिकचे तीन पद रिक्त होते नप चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरूण मोकळ यांनी याबाबत सखोल अभ्यास करून वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी सविस्तर प्रस्ताव संचालक नगरपालिका प्रशासन मुंबई यांच्याकडे पाठवून मान्यता मिळवून घेतली व भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या दिनाचे औचित्य साधून या पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
याबाबत सविस्तर असे की नगर परिषदेतील आकृतीबंधनुसार वर्ग 3 चे 4 पद रिक्त होते तर वरिष्ठ लिपिकाचे तीन पद रीक्त होते सदर पदे भरण्यासाठी शासनाची मान्यता आवश्यक असल्याने नप चे आस्थापन विभाग प्रमुख एम.जे .शहा यांनी नपचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडे शासन निर्णयाचा आधार घेऊन रीतसर प्रस्ताव सादर केला व शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग चार मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यापैकी दिलीप महाजन संतोष रांधवन युनूस पठाण कैलास माने तर वरिष्ठ लिपिक म्हणून सय्यद नजीर यांचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी संचालक नगरपालिका प्रशासन संचलनालय मुंबई यांच्याकडे पाठवून मान्यता मिळून घेतली त्यानुसार जिल्हास्तरावर असलेल्या जिल्हा पदोन्नती समितीने संपूर्ण प्रस्तावाची तपासणी करून या प्रस्तावास मान्यता दिली 1994पासून या नप मध्ये वर्ग चार मधून वर्ग 3 मध्ये अध्यापही कोणत्याही कर्मचारी चे पदोन्नती झाली नव्हती हे विशेष तर मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी धाडसी निर्णय घेत या कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय दूर केला व दिनांक 15 ऑगस्ट 24 रोजी या सर्व पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले बबन कुमटे आस्थापना प्रमुख एम. जे. शहा, का. अ. राजू जाधव, संजय जाधव , चंदेश तायडे विशाल वाघ प्रल्हाद मुंढे , उपस्थित होते. प्रास्तविक प्रकल्प अधिकारी राजेंद्र वानखेडे यांनी केले.