spot_img
spot_img

कृषी सहायकांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कृषी सहाय्यकांनी खरीप हंगाम सन 2023 च्या कापूस व सोयाबीन पिकाची पीक पाहणी केली. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतचे कामकाज करताना उलट कृषी सहाय्यकांवरच

हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कृषी सहायकांनी राज्यभरात कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

कृषी सहायक हाच खरा गावपातळीवर काम करतो. तो कृषी विभागाचा कणा असला तरी त्याला सेवासुविधा दिल्या जात नाहीत. परंतु कृषी सहाय्यकावर काम करूनही हल्ला होत असेल तर काम बंद आंदोलन करावेच लागणार त्यामुळे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटने अंतर्गत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यकांना येणाऱ्या अडचणीच्या सोडवणूकीसाठी शासनाला विनंती केली होती.परंतु कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.दरम्यान राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आणि कृषी सहाय्यकांनी पुरावे देऊनही शेतकरी आक्रमक झाले ते अंगावर धावून येण्याच्या घटना घडल्या आहेत.वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची नावे नसल्याने लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यास विरोध करण्यात आला.छत्रपती संभाजी जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात पिरवावडा येथील कृषी सहाय्यकाला घेरा घालण्यात आला.जळगाव जामोद येथील कृषी अधिकाऱ्यांनाही घेराव घातला.यावर कळस म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील खुलाताबाद तालुक्यातील मुख्यालय सराई येथे कृषी सहाय्यकाला यादीत नाव का टाकत नाही म्हणूनशेतकऱ्यांनी मारहाण केली..यासंदर्भात गुन्हे देखील दाखल झाले आहे.या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी तसेच संघटनेच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आल्याचे कृषी सहाय्यक संघटनेने म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!