4.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

असा सन्मान पाहिजे! – कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक ‘सुरेश जारवाल’  विशेष सेवा पदकाने सन्मानित!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/संतोष जाधव)पुष्पगुच्छ घेऊन नेते व नेत्यांची मुले म्हणा की पदाधिकारी , कार्यकर्ते सन्मान करून घेतात.हा सन्मान नसतोच, हे सर्वश्रुत आहे.खरा सन्मान कशाला म्हणतात ते बघा..
कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक ‘सुरेश जारवाल’  विशेष सेवा पदकाने सन्मानित झाले आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले जे पोलिस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात,नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. गडचिरोली येथे नक्षलवाद्यांविरोधात आखलेल्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी लढा दिला.त्या अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर होते.सदर ‘विशेष सेवा पदक’ नुकतेच जाहीर झाले असून छ. संभाजी नगर(औरंगाबाद) येथील सुपुत्र ,अंढेरा येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पो उ नि सुरेश जारवाल यांना ही विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.सुरेश जारवाल यांनी वर्ष 2022-2023 नक्षलग्रस्त भागात यशस्वी रित्या आपले कर्तव्य बजावले,याच कामाची पावती म्हणून हा सन्मान त्यांना मिळाला आहे.यापूर्वी ही जारवाल यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आलेले आहे,कर्तव्यावर असतांना जबाबदारी पूर्वक काम करणारे अशी ओळख असलेले ,व नेहमीच आपल्या कामाच्या जोरावर पोलीस विभागात आपली वेगळी छाप असलेले जारवाल यांना परत एकदा स्वातंत्र्य दिनी मान्यवरांच्या  हस्ते विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक दिले जाते.जारवाल हे सद्यस्थितीत अंढेरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून ,ग्रामीण भागात आपले कर्तव्य अगदी प्रामाणिक पने पार पाडत आहे,त्यांना मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद असून जारवाल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!