spot_img
spot_img

८० हजार ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या! -मलकापूर अर्बनला न्यायालयात खेचणार! – छत्रपती संभाजीनगर ठेवीदारांचा निर्णय; सहा वकिलांचे पॅनेल तयार

मलकापूर (हॅलो बुलढाणा) बहुचर्चित मलकापूर अर्बन को – ऑपरेटिव्ह बँकेतील गैरप्रकारामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ने मलकापूर अर्बन बँकेचे लायसन्स रद्द केले. यामुळे अनेक ठेवीदार संकटात सापडले आहेत. दरम्यान, ठेवीदारांनी आता बँकेविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी चालविली आहे.

मलकापूर अर्बन बँकेत कष्टकरी, मोलमजुरी करणारे तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचा विविध क्षेत्रातील ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. परंतु, बँकेच्या चुकीच्या पद्धतीच्या कारभारामुळे “आरबीआयने गांभीर्याने दखल घेऊन मलकापूर अर्बन बँकेचे लायसन्स रद्द केले. यामुळे अनेक ठेवीदार संकटात सापडले आहेत.
या मुद्द्यावर माजी आमदार चैनसुख संचेती यांना ठेवीदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याच दरम्यान अनेक ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला होता.
मलकापूर अर्बन को – ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने ठेवीदारांची रक्कम अडकली आहे. वर्षानुवर्षे उलटत आहेत. मात्र, ठेवी परत मिळण्या बाबत काहीच निर्णय होत नसल्याने संतापलेल्या ठेवीदारांनी रविवार, ११ ऑगस्ट रोजी एकत्र येऊन थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा थेट निर्णय घेतला. यासाठी सहा वकिलांची फौज तयार करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील मलकापूर बँकेच्या ठेवीदारांची रविवारी गारखेडा परिसरात बैठक झाली. ७० पेक्षा अधिक ठेवीदार आले होते. बँकेत ८० हजार ठेवीदारांची मोठी रक्कम अडकली आहे. यामुळे आता छत्रपती संभाजीनगर येथील ठेवीदार आक्रमक भूमिका घेत आता मलकापूर अर्बन बँकेच्या विरोधात थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी यासाठी सहा वकिलांची फौज तयार करण्यात आली आहे . पुढील लढाई न्यायालयातच लढण्याचा एकमताने निर्णय झाला.
या बैठकीस मधुसूदन बजाज, सचिन झवेरी, रमेश राजपूत, पूनमचंद अग्रवाल, प्रशांत साहुजी, संजय कांकरिया, अॅड . स्मिता नगरकर, अॅड . संजय गुप्ता यांच्यासह अन्य ठेवीदार उपस्थित होते.

सर्व गोष्टींना अंत आहे म्हणूनच ठेवीदार शांत आहे. हे विसरून चालणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी औषधालाही पैसे नसल्याचे सांगत आपली आपबिती सांगितली.
यावेळी अनेक ज्येष्ठांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. काहींची शस्त्रक्रिया पैसे नसल्याने पुढे ढकलली जात आहे. काहींच्या मुलांच्या उच्च शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जीवनभराची कमाई बँकेत असून, आता उतारवयात लोकांसमोर हात पसरावे लागत आहेत. बँकेतील ठेवी ठेवीदारांना मिळाव्यात यासाठी रिर्झव्ह बँक किंवा सरकार गांभीर्याने लक्ष घालत नसल्याचा आरोप यावेळी ठेवीदारांनी केला. ठेवीदारांच्या हलाखीच्या परिस्थितीस सर्वस्वी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार असून, अखेरचा पर्याय म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय ठेवीदारांनी घेतला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!