चिखली (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या आढावा बैठका, कार्यकर्ता संवाद मेळावा व नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच शेगाव येथे आज बुलढाणा लोकसभा विधानसभा निहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीसाठी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत, बुलढाणा संपर्कप्रमुख प्रा . नरेंद्र खेडेकर यांची उपस्थिती होती.संजय राऊत यांनी यावेळी खास पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.दरम्यान चिखली विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी खा .संजय राऊत यांच्याकडे केली आहे.
आज १३ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शेगाव येथे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा नुसार आढावा घेण्यासाठी आले असता चिखली विधानसभा मतदार संघ शिवसेना उबाठा ला सोडण्याची मागणी यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केली.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा अनुसार आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत त्याचप्रमाणे शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शेगाव येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील विधानसभा नुसार आढावा घेतला. यावेळी ठराविक पदाधिकारीच आमंत्रित होते. यावेळी चिखली विधानसभेतून उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर, तालुकाप्रमुख श्री किसन धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, विष्णू मुरकुटे, गजानन पवार, संतोष वाकडे, अशोक सुरडकर आणि आनंद घ्यायची इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आढावा देत असताना कपिल खेडेकर यांनी लोकसभेमध्ये सर्वाधिक मताधिक्य चिखली विधानसभा मतदारसंघात मिळालेले आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांच्या दोन सभा चिखली मध्ये झालेले आहेत. आणि पक्ष त्याचप्रमाणे संघटनेची पूर्णपणे बांधणी संपूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगली झालेली आहे. येणाऱ्या काळात मध्ये संधी मिळाल्यास नक्की चिखली विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही उपस्थित खासदार संजय राऊत यांना दिली. आणि विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उबाठा यांना सोडण्यात यावा अशी मागणी उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांनी केली.