बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज काँग्रेसच्या आढावा बैठकीत विजय वेडट्टीवार यांची तोफ धडाडली. आधी त्यांनी नाव न घेता आमदार संजय गायकवाड व एकनाथ शिंदे यांच्या सरकारला धारेवर धरले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेवर त्यांनी बोट ठेवले.
ते म्हणाले की, मध्यप्रदेश मध्ये सुद्धा लाडके बहीण योजना आणली मात्र निवडणूक झाल्यानंतर ती बंद करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये हेच चित्र परत दिसणार आहे. २ वर्षे तुम्हाला लाडके बहीण आठवली नाही मात्र निवडणुकीच्या तोंडावर दोन महिने राहिले असता तुम्हाला लाडकी बहीण आठवली कशी हा हल्ला त्यांनी केला. हि योजना सुद्धा जास्त दिवस महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. राज्य सरकार निवडणूक तोंडावर हा पैसा थांबून ठेवत आहे. संजय निराधार योजना श्रावण बाळ योजना अनेक योजनांचे पैसे थांबलेले आहे,असेही ते म्हणाले.