spot_img
spot_img

‘हर्र बोला’ च्या गजराने साखरखेर्डा दणाणले! – महाकालेश्वर संस्थान शिवभक्तांनी फुलले!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा) येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरातील भोगावती नदी काठावरील महाकालेश्वर संस्थानचा वतीने भव्य कावडयात्रा काढण्यात आली . हरहर महादेवच्या गजरात निघालेल्या मिरवणूकीत युवकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महात्मा ज्योतिबा फुले नगरातील युवकांनी सोमवारला सकाळी चार वाजता ओलांडेश्वर संस्थान दुधा – ब्रम्हमपुरी येथे जाऊन तेथील जल घेऊन कावड यात्रा साखरखेर्डा येथे आज दुपारी पोहचली. भोगावती नदी काठावरील महाकालेश्वर मंदीरात जलाभिषेक करुन महात्मा ज्योतिबा फुले नगरातून श्रीराम मंदिर , धनगर पुरा , गणपती चौक , महाराणा प्रताप नगर , बसस्थानक , पलसिध्द महाराज नगर , मेन रोडने पुन्हा भोगावती नदीवर विसर्जन करण्यात आले . गावातून कावड यात्रा सुरु असताना अनेक भाविकांनी पुजा करुन दर्शनाचा लाभ घेतला . या यात्रेत सरपंच सुनील जगताप , युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर , तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी , माजी प्राचार्य तथा भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसरे , गोपाल सिंग राजपूत , ग्राम पंचायत सदस्य संग्रामसिंह राजपूत , मारोती मंडळकर यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते . कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील , ठाणेदार गजानन करेवाड , पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे , रवी सानप यासह पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी यांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता . सकाळी हिंदू सुर्य महाराणा प्रताप नगरातील युवकांनी सकाळी कावड यात्रा ओलांडेश्वर येथून आणली होती . तीचा समारोप गावात आल्यानंतर महाराणा प्रताप नगरात करण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!