spot_img
spot_img

बँकांतील खातेधारकांच्या खात्यात आधार लिंक करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी! -जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) बँकांतील खातेधारकांच्या खात्यात आधार लिंक करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर व जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होत आहे.अनेकांनी अर्ज भरले आणि ते पात्र देखील ठरले. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरणे सुरू आहे. परंतु पात्र लाभार्थ्यांना खात्यामध्ये रक्कम जमा होण्याकरिता लाभार्थ्याची बँक खाते आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.अनेकांचे जनधन योजनेचे खाते बंद पडले आहे त्यात ट्रांजेक्शन झाले नाही.त्यासाठी अनेक महिलांनी इकेवायसी साठी अर्ज केले आहे.सध्या बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी आणि जुने बंद पडलेले खाते सुरू करण्यासाठी अडचणी येत असून वेळ लागत आहे.दरम्यान
बँकांतील खातेधारकांच्या खात्यात आधार लिंक करण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!