spot_img
spot_img

शिवसेना भगवा सप्ताह मेळाव्यात सूर उमटला.. -स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्या!

लोणार (हॅलो बुलढाणा) मेहकर -लोणार विधासभेला स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी मिळावी,असा सूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भगवा सप्ताह निमित्त मेळाव्यात उमटला.

शिवसेना भवन येथे भगवा सप्ताह निमित्त जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ मोरे कृ.उ.बा.स. यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारावर कडाडून टीका केली.ते म्हणाले भाड्याच्या घरात राहणारा आज चारशे कोटीचा मालक झाला आहे गुत्तेदार व सर्वसामान्यांचे मुंडके मोडून हे मोठे झाले आहे, त्याच बरोबर अशात मुंबई पुणे वाल्याचे नाव उमेदवारीसाठी दबक्या आवाजाने ऐकायला येत आहेत परंतु आपल्याला आपल्या मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकालाच तिकिट देण्याविषयीचा आग्रह धरून त्यास निवडून आणण्याचे प्रण करणे आहे असे ते म्हणाले, शहर प्रमुख गजानन जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन करून मेहकर विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत व गद्दारीनंतर संघटन ताकतीने पुनरबांधणी करणाऱ्या गोपालभाऊ बछिरे यांनाच उमेदवारी देण्यात यावी आयात केलेला उमेदवार शिवसैनिक मान्य करणार नाही, ही मागणी पक्षप्रमुखाकडे करून व पक्षप्रमुख मान्य करतील हा विश्वास दर्शवण्यात आला, या मेळाव्यास, महाविकास आघाडीचे ज्ञानेश्वर चिबडे मामा, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख राजूभाऊ बुधवत, अल्पसंख्यांक शहर प्रमुख इकबाल कुरेशी, युवा तालुकाउपप्रमुख अमोल सुटे, महिला उपजिल्हा संघटिका संजीवनी वाघ, तालुका संघटिका पार्वतीताई सुटे, शहर संघटिका शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे अशोक सरदार आदींची मंचकावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख जीवन घायाळ यांनी केले तर आभार युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांनी मानले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!