बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रसिद्ध असलेला जिल्हा बुलढाणा रुग्णालयातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी एसीबी महासंचालक रश्मी शुक्ला यांचा लेटर बॉम्ब धडकल्याने भ्रष्टाचारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यांनी अपर सचिव आरोग्य विभाग मुंबई यांना पत्र देऊन कारवाईचे निर्देश दिले आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात हॅलो बुलढाणा सह दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज ने अनेक भाग प्रकाशित केले आहे.
देऊळगाव राजा येथील चंद्रकांत खरात यांनी देखील यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे.शासनाच्या व संचालक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उल्लंघन केल्याचे आढळून आल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नेमून दिलेले शासकीय कर्तव्य पार न पाडता त्यांनी परस्पर दुर्लक्ष करून व प्रशासकीय आदेश असताना त्यांनी या प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे,असेही पत्रात म्हटले आहे. विभागात येणाऱ्या विकास कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई निश्चित करण्यात येते परंतु अद्याप कारवाई करण्यात आली नाही.मंजूर कंत्राट दाराकडून औषधाचा व साहित्याचा पुरवठा विहित मुदतीत करण्यात आला नाही,त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात आली नाही.हा मोठा कसूर आहे.शिवाय उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित सर्वांची चौकशी होऊन अनेक वर्ष आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वांवरच फौजदारी कारवाई निलंबनाची करण्यात यावी.असा प्रस्ताव
अपर मुख्य सचिव आरोग्य विभाग मुंबई यांना एसीबी महासंचालकांनी पाठविला आहे.त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.