चिखली (हॅलो बुलढाणा) राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा चिखली शाखा स्थलांतरण उदघाटन सोहळा १२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक खंडाळा रोडवरील जनाई व्यापारी संकुलमध्ये सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके, संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले आहे.
अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक राहणार असून उदघाटन फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश अण्णा वाबळे यांच्या हस्ते होणार आहे. तर फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटचे संचालक कडूभाऊ काळे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, चिखली तालुका सहाय्यक निबंधक राजेंद्र घोंगे, अंबिका अर्बनचे अध्यक्ष विजय कोठारी, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, बालाजी अर्बनचे अध्यक्ष मंगेश व्यवहारे, मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक देशमाने, चिखली तालुका शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष परमेश्वर सोळंकी, सुविधा अर्बनचे अध्यक्ष अनिल काळे, आदर्श अर्बनचे अध्यक्ष विलास भडाईत, विदर्भ शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू अंबासकर, गुरू गजानन महिला अर्बनचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर दळवी, संत तुकाराम अर्बनचे अध्यक्ष सुनील वानखेडे, महालक्ष्मी अर्बनच्या अध्यक्षा प्रज्ञाताई भालेकर, शिवराई महिला अर्बनच्या अध्यक्षा अरुणाताई अंबासकर, माँ जिजाऊ महिला अर्बनच्या अध्यक्ष विमलताई जाधव, सर्वज्ञ महिला अर्बनच्या अध्यक्ष वंदनाताई सावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.