बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पवित्र श्रावणात कावडयात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य-दीव्य स्वरूप प्राप्त होत आहे. ‘हर बोला महादेव’ च्या गजराने अवघे शहर दणाणून जाते.आज रात्री 12 वाजता बुलढाणा येथे दयावान ग्रुप कडून कावड यात्रा काढण्यात येणार आहे.
श्रावण महिना हिंदु संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तिर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदीरात जलाभिषेक करीत असतात. आज रात्री भागवान शंकर यांची पूजाअर्चा करून बुधनेश्वर ते बुलढाणा पायी 25 किमी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. ही कावड यात्रा यशस्वी होण्यासाठी मुन्ना बेंडवाल यांचे नेतृत्व लाभणार आहे. शिवभक्तांनी या कावड यात्रेत सामील व्हावे असे आवाहन दयावान ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.