4.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

“दिल धड़कने का सबब याद आया..!” -त्यांच्या आठवणीतही ‘जय’ श्री!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा टीम) “दिल धड़कने का सबब याद आया ; वो तिरी याद थी अब याद आया ” ही शायरी काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके ताईंनी फेसबुकवर आज झळकविली.नासिर काजमी यांची ही शायरी! ही शायरी फेसबुकवर टाकण्या मागचे कारण म्हणजे सुनिलदादा शेळके विदेशवारीवर गेले आहेत ते ही युरोपला! मग सहाजिकच ताईला ‘त्यांची’ आठवण तर येणारच नां?पुन्हा मोबाईल आठवण करून देतोच.. त्यांचा एखादा नव्या लुकचा आणि युनिक जागेवरील फोटो फेसबुकवर दिसून पडला की,या फोटोत आपण नसल्याचे ताईंना देखील क्षणभर थोडं वाईट तर वाटणारच! पण ही सारी जादू प्रेमाची आहे. सुनील दादांच्या आठवणीत ‘जय’ श्री कायम आहेतच!

प्रिय व्यक्ती आपल्यापासून लांब असली तरी आपल्या मनात त्याच्या आठवणी कायम रुंजी घालत असतात. सुनील दादा आणि जयश्रीताई यांचे अतूट प्रेम हेवा वाटण्यासारखे आहे.
प्रत्येक जण जीवनात मोरपंखी स्वप्नांचे पिसारे फुलवत असतो.परंतु हे मयूर पंखी स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम ताई आणि दादांनी केले आहे. लग्नाआधी आणि लग्ना नंतरही अनेक वर्षं सरली तरी त्यांची उत्कटता तीच…अगदी कालच घडल्यासारखी !
ज्यांच्या नावातच जय आणि श्री आहे, त्या ताई काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाची धुरा जबाबदारीने सांभाळत आहेत.राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे.सुनील दादा ही कमी नाहीत. उपजिल्हाधिकारी पदाची स्वेच्छा निवृत्ती घेऊन अभिता कंपनीद्वारे मुंबईत त्यांनी पाळेमुळे खोलवर रुजवली.चित्रपटक्षेत्रात देखील त्यांनी यशस्वी पाऊल टाकले.दोघेपण खांद्याला खांदा लावून समाजकार्य करतात.दोघांचेही उत्कट प्रेम!दोघेही एकापेक्षा एक!त्यामुळे दादा युरोपला गेले आणि त्यांची आठवण येणार नाही असे होऊ शकत नाही. ताईंना आठवण येते ते या कवितेप्रमाणे येत असावी..

“काय म्हणालास? आठवण?
हो, येते ना तुझी आठवण

कधी सायंकाळचा गारवा तर
कधी सकाळचं कोवळ ऊन घेऊन

कधी ओठातले शब्द तर
कधी निशब्द झालेले मौन घेऊन

कधी रेटाळलेला दिवस तर
कधी नकळत सरलेला क्षण घेऊन

कधी डोक्यातला विचार तर
कधी झोपेतलं सुंदर स्वप्न घेऊन

कधी ह्रदयातलं स्पंदन तर
कधी वाट बघणारं मन घेऊन
हो, येते ना तुझी आठवण !

  ‘हॅलो बुलढाणा’ ची ही सुंदर बातमी  विदेशात सुनीलदादा वाचतीलच! आम्हाला  गर्व आहे ‘हॅलो बुलढाणा’ विदेशातपण  पोहोचला! 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!