spot_img
spot_img

चोरट्यांनी जुगारासाठी केला जुगाड! -विद्युत मोटार पंपातील तांब्यांची तार चोरली!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/ सुभाष नरवाडे) नागपंचमीचा जुगार खेळण्यासाठी जुगाड तर करावाच लागेल!त्यामुळे चोरट्यांनी

शेवगा शिवारात कोराडी प्रकल्पावर शेतीला सिंचनासाठी बसविण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या मोटार मधील तांब्याची वायर मोटारीची तोडफोड केली.तसेच जवळपास वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या विद्युत मोटर पंपाला या चोरट्यांनी चुना लावला आहे.

साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेवगा जाॅहागीर हे गाव कोराडी प्रकल्पाच्या बाजूला वसलेले आहे.या गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात आहेत. कोराडी प्रकल्पावरुन या शेतकऱ्यांनी पाईप लाईन करुन सिंचनाची सोय केली आहे . भाची , पाला यासह बागायती शेती करुन आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्याने सर्वच शेतकऱ्यांच्या मोटारी बंद आहेत. ७ ऑगस्ट रोजी काही शेतकऱ्यांना आपल्या मोटार पंपाची खोल फिटींग काढून अज्ञात चोरट्यांनी आतील तांब्याची तार चोरुन नेल्याचे लक्षात आले . ही वार्ता गावात पसरताच सर्वच शेतकरी मोटार पंप शोधन्यासाठी गेले असता जवळपास २५ शेतकऱ्यांच्या मोटारी खोलून तर काहींच्या फोडून त्यातील तांब्याची तार चोरुन नेल्याचे लक्षात आले . उपरोक्त घटनेची माहिती बीट जमादार प्रविण सुरळकर यांना देण्यात आली . परंतू पंचनामा करून गुन्हा दाखल करु असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले . त्यामुळे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . हंगामात शेतकऱ्यांना मोटर पंप सुरू करण्यासाठी नाहकच २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च लागणार आहे . त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून , लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी बबन काकडे , भगवान सुरुशे , सुमित गवई , समाधान गिऱ्हे , अरुण गिरी महाराज , विष्णू खरात यांनी आणि शेतकऱ्यांनी केली आहे .
—————-
साखरखेर्डा पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीवरील मोटार पंपाची चारवेळा चोरी!

साखरखेर्डा येथील पाणीपुरवठा योजना ही कोराडी प्रकल्पावरुन करण्यात आली आहे . पावसाळ्यात महालक्ष्मी तलाव भरल्यानंतर कोराडी प्रकल्पाच्या विहिरीकडे ग्रामपंचायत फारसे लक्ष देत नाही . त्यामुळे सहा ते आठ महिने मोटार पंप बंद राहतो . त्यामुळे चोरट्यांनी चार वेळा मोटार पंप काढून चोरुन नेला आहे . यावेळी हा मोटार पंप सुरु असल्याने चोरटे त्याकडे फिरकले नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!