बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन परीवारा कडून बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वंच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला असुन त्यामुळे नवचैतन्याची लहर मार्केट मध्ये दिसत आहे. मंडळाच्या वतीने यावर्षी दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
बुलडाणा अर्बन मंडळाचे यावर्षी 23 वे वर्षे असून यावर्षी 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.गणेश उत्सावानिमित संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये अध्यक्ष महेश प्रभाकर चेकेटकर तर उपाध्यक्षपदी संजय मुरलीधर राजगुरे,तर सचिवपदी प्रशांत श्रीराम काळवाघे , सहसचिव शिरिष पद्माकर देशपांडे , कोषाध्यक्ष संजय गणपतराव कस्तुरे, सहकोषाध्यक्ष सुमंत भास्कर इंगळे,तर सदस्य सर्वश्री कैलास दुर्गाप्रसाद मिश्रा, मोहन रघुनाथ दलाल, गजानन विश्वनाथ चवरे, गजानन अंबादास पाटील, नरेंद्र शिवलाल शर्मा, संजय प्रभाकर कुलकर्णी, निलेश सुरेशराव बनसोडकर,सौ.मनिषा संजय जोशी,सौ.प्रिती अनिरुद्ध कोलारकर, सौ.विद्या विजय निकम, अनिल वासुदेव महाले, प्रशांत देविदास घुसळकर, शेखर श्रीराम अंबेकर, कैलास तुळशीराम निकम, संजय अंबादास पाठक,अजय विजय कऱ्हाळे, संजय मनोहर भागवत, डिगांबर जनार्दन डवळकर,स्वप्निल मधुकर ठाकुरद्वारे, विक्रांत सराफ, सुधाकर शिवाजी मानवतकर, परमेश्वर भगवान शिंदे यांचा समावेश आहे
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर , सचिव प्रशांत काळवाघे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.