बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भोल्या शंकराला आवडते त्या ठेक्यावर पारंपरिक वेशभूषा केलेल्या तरुणाईची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घरा-घरांतून होणारी पुष्पवृष्टी अशा मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपणारी शोभायात्रा महाकाल ग्रुपने बुलढाण्यात उत्साहात पार पडली.विशेष म्हणजे महाकाल ग्रुपच्या वतीने प्रथम मानाची कावड होती आणि याला उदंड प्रतिसाद लाभला.
बुलढाणा तालुक्यातील बुद्धनेश्वर येथील महादेव मंदिरयेथून रात्री बारा वाजता कावड यात्रेला सुरुवात झाली.रात्री ठीक बारा वाजता महादेवांची आरती करून कावड यात्रेने मार्गक्रमण केले.कावड यात्रा बुलढाणा कडे येत असताना अनेक गावकऱ्यांनी यात्रेची स्वागत करून फराळ वाटप केले.सदर कावड यात्रा जयस्तंभ चौक बुलढाणा आल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आरती केली.या कावड यात्रेने तरुणाई मध्ये एकच जल्लोष भरला होता.