सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे आज शेतकऱ्यांचा जन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.सदर मोर्चाला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर यांचे प्रमुख नेतृत्व लाभले.तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये श्री नरेश शेळके कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा व गायत्री शिंगणे महिला जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे उपस्थित होते.
बस स्टँड चौक सिंदखेड राजा ते तहसील कार्यालय सिंदखेड राजा इथपर्यंत शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.त्यानंतर तहसीलदार सिंदखेड राजा यांना शेतकऱ्यांच्या मागणीचे पत्र देण्यात आले.
सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी रोहि तसेच इतर वन्य जीवामुळे मागील काही वर्षांपासून अतिशय त्रस्त झाले आहेत, रात्र रात्र जागून पिकांचे रक्षण त्यांना करावे लागत आहे तरी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने शेतीसाठी कंपाउंड उभारणी करीता 100% टक्के अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसह, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, 2023 24 ची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात यावी याही मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
आपल्या अगदी साध्या मागण्यांसाठी जर शेतकऱ्यांना आक्रोश करावा लागत असेल तर हे सरकार बहिरे झाले आहे का?? रोही आणि रानडुकरांनी त्रस्त शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा आता अतिशय शांततेने आम्ही काढला आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, पुढील आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा आमच्या मागण्याची योग्य दखल न घेतली गेल्यास, त्याची योग्य ती किंमत स्थानिक लोकप्रतिनिधी व उच्चपदस्थ अधिकारी यांना चुकवावी लागेल असा सज्जड इशारा गायत्री शिंगणे यांनी दिला.
याप्रसंगी राजेश अंभोरे, राजेश इंगळे, अमोल भट, विजय खान्देभराड, अरुण मोगल, अशोक मोगल, अभय मोगल, रवी मिस्किन, जनार्दन मगर, आरिफ खान,रवी इंगळे, महेश मखमले, संतोष बर्डे, विशाल बंगाळे यांचेसह अनेक कार्यकर्ते तसेच हजारो सामान्य नागरिक हजर होते.